भुसावळ प्रतिनिधी – शहरातून जाणार्या महमार्गावर होणार्या अनेक अपघातात प्राणी जखमी होतात. मात्र या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. तसेच स्पर्धा परीक्षार्ंथींसाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत गो सेवकांनी पालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
यानिवेदनात,अपघातासह अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या प्राण्यांसाठी जीव संगोपनासाठी नगर पालिका हद्दीत जागा देण्यात यावी. तसेच स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासीकेसाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात, या बाबींबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. या बाबत गांभीर्याने दखल घेऊन मागणीची पुर्तता करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे.



