भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन :

भुसावळ-येथील नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दि.०९फेब्रुवारी २०२२ वार बुधवार रोजी नाहाटा महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात सकाळी 11.00 वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले असून सदर शिबीराचे आयोजन माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार आणि ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांच्या वाढदिवसानिमित्त केलेले आहे तरी या रक्तदान शिबीरात भुसावळ शहरातील इच्छुक रक्तदात्यांनी तसेच नाहाटा महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे.या रक्तदान शिबिरासाठी जळगांव येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिबीर समन्वयक आणि माजी विद्यार्थी संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील,सचिव प्रा.डॉ.जी.आर.वाणी आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.