भुसावळ – येथील जॉयन्ट्स वसुंधरा गृपच्यावतीने रमाई जयंती व रथसप्तमी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. . यावेळी रथसप्तमी निमित्त सर्व सदस्यांनीं ‘ॐ भास्कराय नमा:’ च्या गजरात नऊवारी साड्या परिधान करून सूर्य नमस्कार घातले.
पंढरीनाथ नगर भागात मंदाकिनी केदारे यांचे निवासस्थानी टेरेसवर आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्र महिला विभाग प्रमुख दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष अरुणा इंगळे, जळगाव जिल्हा महिला प्रमुख दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया, प्रमिला किशोर भालेराव , पत्रकार उज्वला बागुल , महिला वकील संघाच्या अध्यक्षा अँड जास्वंदी भंडारी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
तदनंतर प्रमुख पाहुणे अरुणा इंगळे , प्रमिला किशोर भालेराव यांनी रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्याची सविस्तर माहीती देवून जीवनपट उलगडला. तर पत्रकार उज्वला बागुल यांनी डॉ बाबासाहेब व रमाई यांच्या विचारातून अमुलाग्र क्रांती घडली असून रमाई यांच्या दूरदृष्टिची दखल त्याकाळात डॉ आंबेडकरांनी घेतल्याने आज सर्व महिलांना न्याय मिळत असून. भेदभाव न करता सर्वानी एकत्र या असा समानतेचा मूलमंत्र आपल्या सर्वांसाठी डॉ आंबेडकर व रमाई यांनी दिला असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच शरीर स्वास्थ्यासाठी व
शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी
सूर्यनमस्कार करणे आवश्यक असते.असे सांगून सातत्याने सूर्यनमस्कार केल्यास शारीरिक लाभ तर प्राप्त होतातच शिवाय मंत्र उच्चारासहित सूर्यनमस्कार केल्यास मानसिक स्थिरता प्राप्त होते. शारीरिक, मानसिक विकार दूर होऊन सकारात्मक उर्जा प्राप्त होते असेही बागुल यांनी यावेळी सांगीतले. तर अँड जास्वन्दी भंडारी यांनीही महिलांनीं आरोग्या बरोबरच र्कौटुंबिक जबाबदारी व कर्तव्य संभाळून समाजकार्य करावे असा संदेश मनोगतातून महिलांना दिला. तर यावेळी मंदाकिनी केदारे यांनी प्रस्ताविकात वसुंधरा जायंट्स गृपच्या कार्याची थोडक्यात माहीती सांगितली तसेच रमाई यांचे जीवन कार्यावर अतिशय मार्मिक अशी स्वलिखित कविता सादर केली. सुरेखा तायडे ,ज्योती पवार ,दिपीका मेश्राम, रमामाई यांच्या कार्यावर लक्षवेधी एकपात्री नाटिका रूपाली पाटणकर यांनी सादर केली .
दरम्यान सामूहिक सूर्यनमस्कार साधना कार्यक्रमात आणि ७५ करोड सूर्यनमस्कार अभियानातंर्गत जॉयन्ट्स वसुंधरा गृपच्या महिला सदस्यानी नऊवारी परिधान करून सूर्यनमस्कार घातले .
कार्यक्रमात सुरेखा तायडे ,ज्योती पवार ,दिपीका मेश्राम , रमामाई यांच्या कार्यावर लक्षवेधी एकपात्री नाटिका रूपाली पाटणकर यांनी सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा सोनवणे व आभार प्रदर्शन राजश्री बादशाह यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेकरीता वसुंधरा जायंट्स ग्रुपच्या उपाध्यक्ष ,राजश्री बादशाह सचिव ,रूपाली पाटणकर कोषाध्यक्ष मंदाकिनी केदारे सदस्य ,रेखा सोनवणे,सुरेखा तायडे ,नीलिमा पाटिल, दीपिका मेश्राम,ज्योति पवार,कविता महाले,तिलोत्तमा जावळे,सुरेखा राने,मीना राजपूत, अलका सपकाळे, अनिता ठाकरे,
तसेच अनिता राऊत , कमल जाधव, वंदना रत्नपारखी ,रीना गायकवाड , प्रतीक्षा बर्हाटे,सर्व सदस्यानी परिश्रम घेतले.








