नशिराबादजवळ अपघात : दुचाकीस्वार ठार –

जळगाव : भुसावळकडून जळगावकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने पातोंडा गावातील दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबतचा एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात नशिराबादजवळील पाटील नर्सरीजवळ घडला. या प्रकरणी शनिवार, 5 फेब्रुवारी रोजी रात्री नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर भास्कर झाल्टे (24, रा.पातोंडा, ता.नांदूरा, जि.बुलढाणा)असे मयताचे नाव आहे.

अज्ञात वाहनाची धडक
किशोर झाल्टे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. 22 जानेवारी रोजी किशोर झाल्टे आणि त्याचा मित्र दीपक मधूकर सुरळकर (रा. कोथळी, ता.मोंढाळा, जि.बुलढाणा) हे कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच 28 बीजे 930) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव येथे येत होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील पाटील नर्सरीकडून जळगावकडे येत असतांना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार किशोर झाल्टे हा जागीच ठार झाला तर दीपक सुरळकर हा गंभीररीत्या जखमी झाला. जखमीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मयत किशोर झाल्टे यांचे वडील भास्कर श्रीराम झाल्टे यांच्या फिर्यादीवरून शनिवार, 5 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात ( अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहे.