रिद्धि जान्हवी फाउंडेशनच्यावतीने हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न :

जळगाव – रिद्धि जान्हवी फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकुम उत्साहात साजरे करण्यात आले.
कार्यक्रम च्या प्रारंभी लहान बाळा चे औक्षण करून फळ, चॉकलेट,गोड वस्तु वाटप करण्यात आले.
त्या नंतर कार्यक्रमात जमलेल्या महिलांनी एकमेकास हळद कुंकू करून उखाणे ,नृत्य,गाणे सादरी करण केले.
सदर कार्यक्रम महाबळ येथील ज्योती जेथले यांच्या प्रांगणात करण्यात आले, कार्यक्रमाला रिद्धि जान्हवी फाउंडेशन च्या चित्रलेखा मालपाणी,ज्योती जेथले,सीमा नवाल,सुरेखा झंवर,राखी मुंदड़ा,सारिका मंडोरा,सुशिला मंडोरा, अनिता लाठी,निलीमा सोमाणी,कल्पना काबरा मंगला पाटील इ उपस्थित होते.