भुसावळ – अनुश्री बहुद्देशीय संस्था आयोजित ‘क्रांतीज्योती सावित्रीमाईची लेक’ या सन्मान सोहळ्यात ॲंड. जास्वंदी भंडारी यांचा सावित्रीबाईची लेक हा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. येथील आय एम ए भवनात न्यायाधीश आरिफ शेख यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. विविध क्षेत्रात स्वतःचा संसार सांभाळून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान यावेळी आयोजकांनी केला. असे सन्मान सोहळे झाले तर महिलांना अधिक उत्तम कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते असे मत आयोजक सौ जयश्री इंगळे यांनी व्यक्त केले ॲंड. जास्वंदी भंडारी(पाटील) यांनी कॉलनीतील नागरी समस्या , जनजाती समाज बांधवांसाठी करत असलेले कार्य व विविध स्तरातून कायदेविषयक जागृती यासाठी सन्मानपत्र , सावित्रीबाई ची प्रतिमा व पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्या काळात महिलांना स्वतःच्या घराच्या ओसरीत येऊन मत व्यक्त करण्याचा अधिकार नव्हता अशा काळात सावित्रीबाईंनी मुलींनी शिकावे यासाठी अविरत प्रयत्न केले म्हणूनच आज आम्ही सर्व हा सन्मान घेण्याच्या योग्यतेचे झालोत, सावित्रीबाई आपलं कार्य करत असताना त्यांनी कोणताही गाजावाजा किंवा बढेजाव केला नाही म्हणूनच त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले असाच आदर्श सर्व सेवाभाव ठेवणार्या भगिनींनी ठेवावा असे मत यावेळी ॲड. जास्वंदी भंडारी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



