भुसावळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जानेवारीत भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यात बनावट मद्य विक्री, हातभट्टीची दारु निर्मिती व विक्री केंद्रांवर कारवाई करीत 12 लाख दोन हजार 977 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप व राज्य उत्पादन विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजीत कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, दुय्यक निरीक्षक सत्यविजय ठेंगडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, व दुयुयम निरीक्षक सत्यविजय ठेंगडे करीत आहे.


