भुसावळ – शहरातील १५ बंगला प्रल्हाद नगर, प्रभाग क्रं. १२ येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहर व तालुकातर्फे संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू घेण्यात आले यावेळी पैठणी साडीसह विविध वस्तूचे वाण महिलांना देण्यात आले .यावेळी पक्षावर विश्वास ठेवून शेकडो महीलानी रॉ कॉ मध्ये जाहिर प्रवेश घेतला .
महिलांच्या न्याय व हक्कासाठी , महिलांना स्वयं रोजगाराच्या संधी यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार ,तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयात महिलांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यास सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी महिलांच्या पाठीशी सदैव उभी आहे व राहील असा विश्वास
जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी उपस्थित महिलांना दिला. यावेळी व्दारका पाटील, सौ संगिता भामरे , जिल्हा सौ सरचिटणीस, सौ सारीका पाटील तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ नंदा निकम शहर अध्यक्ष रा.कॉ.पार्टी भुसावळ, प्रतिभाताई तावडे जिल्हा उपाध्यक्ष , जयश्री मॅडम, युवती अध्यक्षा रा. कॉ. पार्टी, सुनंदा बगाडे यांचेसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
सौ संगीता भामरे उपस्थित महिला पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले .
भुसावळ शहर व तालुक्यातील महिलांनी संघटित होवून महिलांवरील अन्याय,व अत्याचाराचा विनाश व्हावा , महिलांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी जास्तीत जास्त महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी व्हावे असे आवाहन शहर अध्यक्ष सौ नंदा निकम यांनी केले



