ट्रकची जोरदार धडक : महिला जागीच ठार : भुसावळातील दुर्दैवी घटना :


भुसावळ – शहरातील यावल रोड वरील राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या कार्यालयासमोर पायी जाणाऱ्या महिलेला ट्रकने जोरदार धडक दिल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घडली.
अधिक माहिती अशी की,आज रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मेथाजी मळा, तू.सु.झोपे शाळे जवळील महिला मिनाबाई मोहन अग्रवाल वय ५५ ही मंदिरात पायी जात असतांना यावल रोड वरील राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या कार्यालया समोर ट्रक (जे.के. ००४५) क्रमांक ने महिलेस धडक दिल्याने जागीच ठार झाली आहे.अर्ध्या तासानंतर घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक ललित मराठे व परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
दरम्यान घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहचून मृतदेहाला रुग्णवाहिकेमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी विवाहित व पती असा परिवार आहे.