भुसावळ – येथील रहिवासी सौ.अक्षरा अमोल साबळे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे अंतर्गत दि.26 सप्टेंबर 2021 रोजी पार पडलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा( सेट) उत्तीर्ण केली आहे.
सौ.अक्षरा या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून अर्थशास्त्र विषयात पीएचडी करीत आहेत.
भुसावळ येथील वृत्तपत्र एजंट साबळे ब्रदर्सचे प्रोप्रा. सुनील साबळे यांच्या त्या स्नूषा असून प्रोप्रा. अमोल सुनील साबळे यांच्या सुविद्य पत्नी आहेत.



