अल्पवयीन मतिमंद मुलीवर नराधमांचा अमानुष अत्याचार केल्या प्रकरणी न्याय न मिळाल्यास कोळी समाज उतरणार रस्त्यावर – इशारा


भुसावळ – यावल तालुक्यातील सांगवी गावात 26 जानेवारी रोजी
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही नराधमांनी अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना घडल्याने आदिवासी कोळी समाज बांधवांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून अत्याचार प्रकरणी न्याय न मिळाल्यास कोळी समाज उतरणार रस्त्यावर असल्याचे कोळी समाजाचे भरत पाटील (कोळी)यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात 29 रोजी आयोजित पत्रकार परिषद इशारा दिला आहे.

यावेळी दीपक सोनवणे, विशाल सूर्यवंशी कंडारी, चंद्रकांत सपकाळे, देवेंद्र सपकाळे, विजय रायपुरे, दिलीप कोळी, धीरज कोळी, तुषार सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, रोहित कोळी, समाधान सावळे, कंडारी ग्रा प सदस्य अजय मोरे, सुनील सूर्यवंशी, फेकरी येथील देविदास कोळी, कासव येथील विनोद कोळी यांच्यासह आदी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देश हा प्रजासत्ताक दिनाचा या कार्यक्रमात उत्साहात हे होतं आणि जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सांगवी यागावी दलित कुटुंबातील एका मतिमंद चौदा ते पंधरा वर्षाची लहान मुलगी त्याच्या वरती काही नराधमांनी अमानुषपणे अत्याचार करत होते . साधारण तीनच्या दरम्यान शौचालयाला जात असताना तिचा तोंड आणि गळा दाबून तिला एका निर्जन स्थळी घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने त्यांनी तिच्या शरीराची लचके तोडले आम्ही सर्व समाज बांधव त्यांच्या जाहीर निषेध करतो आणि शासनाला कळकळीची विनंती करतो की त्यांच्या वरती एसटी अॅट्रॉसिटी दलित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे . त्यांना जिवे मारण्याची धमकी तसेच त्यांच्या कुटुंबांना संरक्षण मिळाले पाहिजे.महाराष्ट्र सरकारने त्यांना पुनर्वसनासाठी तात्काळ मदत जाहीर करायला हवी जेणेकरून त्या कुटुंबाला सहकार्य होईल राज्य सरकारला आम्हीच संपूर्ण समाज बांधव विनंती करतो त्या पूर्ण परिवाराला त्यांनी पोलिस बंदोबस्त द्यावा त्यांच्या संरक्षणाची भविष्यातही पुढील मुलीच्या जीवितास धोका राहील म्हणून त्यांनी पोलिस बंदोबस्त द्यावा याच्यासह इतर मागणी आहे की त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे जेणेकरून अशी घटना व्हायला नको आणि विशेष सरकारी वकील राज्य सरकारने या ठिकाणी उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशा कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी आदिवासी कोळी समाज बांधवांची मागणी आहे आणि सदर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालण्यात यावा आणि त्याचा लवकरात लवकर निर्णय व्हावा खटला अंडर ट्रायल व्हावा जेणेकरून असे नराधम मुकाट सुटता कामा नये आणि त्यांच्या वासनेला दुसऱ्या कोणीही बळी पडू नये असा आदिवासी कोळी समाज बांधवांची कळकळीची विनंती आहे लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यांची विनंती आहे .अल्पवयीन पिढीला नयना मिळाल्यास संपूर्ण कोळी समाज तर्फेन्यायासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे