प्रल्हाद नगर भागात चोरीचा प्रयत्न ; नागरिकांनी संशयितास पोलिसांच्या केले स्वाधीन !

भुसावळ – शहरातील पंधरा बंगला भागातील प्रल्हाद नगर मध्ये आधाऱ्यांचा फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना सकाळी उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की,पंधरा बंगला भागातील प्रल्हाद नगर मधील त्र्यंबक सोनाजी उंबरकर वय 70 हे सकाळी घरात असतांना घराच्या मागील बाजूस आवाज आल्याने त्यांचा मुलगा जयकुमार उंबरकर ला बाहेर पाठवून पाहणी केली असता एक इसम घराच्या मागील बाजूस बसलेला दिसला. कोणीतरी येत असल्याची कुजबुज लागल्याने त्या इसमाने शेजारील घराच्या भीतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला.जयकुमार उंबरकर यांनी त्या इसमास पकडून विचारपूर केली असता दिनेश कुमार शर्मा असे नाव सांगितले कानपुर वरून आल्याचे सांगितले.आरडा-ओरड करताच सकाळी 04.30 वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व बाजारपेठ पोलीस8 स्टेशनला फोन करून घटने बाबत माहिती दिली असता काही वेळेतच पीएसआय व पोलीस कर्मचारी पंधरा बंगला,प्रल्हाद नगर भागात घटनास्थळी पोहचले व त्या इसमास वाहनात बसवून पोलीस स्टेशनला घेऊन आले.

भुसावळ शहरातील पंधरा बंगला,प्रल्हाद नगर भागात सकाळी 04.30 वाजेच्या दरम्यान त्र्यंबक सोनाजी उंबरकर यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस एक इसम चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना दिनेश कुमार शर्मा राहणार कानपुर यास चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना पकडले.यांची अंगझडती घेतली असता याकडून बिडी व माचीस मिळून आली.त्या इसमास बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता चोरीची कुठलीही घटना घडली नसून नागरिकांनी पकडलेला व्यक्ती वेडसर असल्याने त्यास सोडून दिले दोन दिवसांपूर्वी डोळे यांची मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न भुसावळ शहरातील पंधरा बंगला,प्रल्हाद नगर भागात काही चोरट्यांनी दिनांक 22/01/2022 रोजी सकाळी 03.00 वाजेच्या सुमारास अजय गजानन डोळे यांची मोटरसायकल चोरी करण्याचा डाव फसला. चोरीचा प्रयत्न करीत असतांना डोळे यांनी मोटरसायकल रसवंतीच्या गाडीला लोखंडी साखळीने बांधल्याने चोरांचा चोरीचा प्रयत्न फसला.साखालीओढण्याचा आवाज आल्याने गजानन डोळे व त्यांचा मुलगा अजय डोळे बाहेर आले असता त्यांना शंका आली की गाईच्या धक्क्याने मोटरसायकल पडली असावी मात्र त्या ठिकाणी शेणा2मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचा पाय भरल्याचे निशाण असल्याने त्यांना खात्री झाली की कुणीतरी अज्ञात इसम मोटरसायकल चोरण्याचा बेतात होते.पण घरातून आवाज आल्याने त्यांनी पळ काढला.दोन दिवसात दोन चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याने पोलीस प्रशासनाने पंधरा बंगला,प्रल्हाद नगर भागात रात्रीची पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.