वरणगाव – भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडा येथिल विवाहीत महिला घरात कोणालाही न सांगता दागिने व रोख रक्कम घेवून निघून गेल्याची घटना शनिवार रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडल्याने’ याबाबत तिच्या पतिने वरणगाव पोलिस ठाण्यात हरविल्याबाबत तक्रार केली आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , दि २२ शनिवार रोजी सौ .योगीता संभाजी चौधरी (वय २२) ही घरात कोणास काही एक न सांगता अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन घरातून निघून गेली आहे . तीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही गावात आजूबाजूला व नातेवाईक यांच्याकडे तपास केला असता ती कोठेच मिळून आली नाही .सौ .योगीता संभाजी चौधरी हिचा रंग गोरा शरीराने मध्यम बांधा उंची 5.2 इंच चेहरा गोल डोळे मोठे अंगात निळ्या रंगाची साडी व निळ्या रंगाचे ब्लाउज पायात सॅंडल अशा वर्णाची व तीच्या सोबत सोन्याचा चपला हार नेकलेस लटकन व साखळी दोन अंगठ्या असे एकूण 10 तोळे सोने व रोख 25000 रुपये असा एकुण ऐवज सोबत असल्याची तक्रार तिचा पति संभाजी विठ्ठल चौधरी (वय ३२) राहणार अंजन सोंडा तालुका भुसावळ धंदा नौकरी यांनी वरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष कुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शना खाली पोहेकॉ अली , मनोहर पाटील करीत आहे.



