भुसावळ- शासनाच्या धोरणाप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण ,नजीकच्या काळात येणाऱ्या परीक्षांसाठी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक होणार असल्याने विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने 1784 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे आणि उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांनी दिली.
सहकारी शिक्षकांच्या टीम वर्क ला सलाम!
लसीकरण पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाच्या आवारातच जीवशास्त्र विभागात लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे वर्ग आणि तुकडी निहाय स्वतंत्र टीम करण्यात आल्या. लसीकरण करून घेण्याची जबाबदारी संबंधित वर्ग शिक्षक आणि शिस्त समितीच्या सदस्यांवर सोपवण्यात आली. एन.एस.एस अधिक दोन स्तर च्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री भंगाळे आणि त्यांचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा महेश सरोदे आणि इतर सहकारी .शिक्षकांनी या कामी सर्वतोपरी सहकार्य केले. एन.एस.एसच्या वतीने विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले. लसीकरण करताना विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या शिक्षकांवर टाकण्यात आल्या होत्या. सर्व सहकारी शिक्षकांनी लसीकरण राष्ट्रीय काम आहे, विद्यार्थी हिताचा उपक्रम आहे ,म्हणून उस्फुर्त सहकार्य केले. माझ्या सर्व सहकारी शिक्षक बंधू-भगिनींचा यांच्या मनापासून अभिनंदन करतो. या शब्दात उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांनी सहकाऱ्यांच कौतुक केलं.
या कॅम्पचे उद्घाटन नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार , संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांच्या मार्गदर्शनाखाली, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, सुप्रसिद्ध उद्योजक दीपक चौधरी, पत्रकार (माध्यम तज्ञ) शेखर पाटील, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत , उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे, पर्यवेक्षक श्रीमती प्रा शोभा तळेले, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कोविड १९ ची लस अत्यंत सुरक्षित असून, विद्यार्थ्याला कसलाही त्रास होणार नाही, याची खात्री मुख्याधिकारी यांनी आपल्या भाषणात दिल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग आणखीनच वाढला. कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.टी एस सावंत, प्रा.आर एम खेडकर, प्रा. स्वाती पाटील, प्रा. एन. वाय पाटील, प्रा शैलेश पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयीन कर्मचारी निवृत्त जीवशास्त्र विभाग, या सर्वांचे सक्रीय सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या नियोजन आणि यशस्वीतेसाठी, उपप्राचार्य डॉ.एस व्ही पाटील, डॉ.बी एच बऱ्हाटे, डॉ. एन. ई भंगाळे, डॉ. ए डी गोस्वामी, यांचे मार्गदर्शन लाभले.



