भुसावळ -गेल्या काही महिन्यांपूर्वी भुसावळ तालुक्यातील साकेगाव कंडारी गावाचा जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत निवड करून नामदार गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय सावकारे यांनी योजना यशस्वी मंजूर करून घेतलेली आहे या योजनेसंदर्भात नामदार गुलाबराव पाटील यांनी भुसावळ तालुक्यातील साकेगाव कंडारी गावातील पाणीप्रश्नासाठी कुठलाही पक्षपात न करता सढळ हाताने कोट्यवधी रुपयांचे निधी साकेगाव व कंडारी गावासाठी मंजूर करून तांत्रीक मान्यता मिळवून दिलेली आहे यामुळे साकेगाव व कंडारी गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला असून दिनांक 23 जानेवारी रोजी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या सह साकेगाव व कंडारी ग्रामपंचायत सरपंच कमिटी मेंबर आदींनी भेट घेऊन गावातील भविष्यातील शेकडो वर्षांचा पाणी प्रश्न मार्गी लागल्या मुळे महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त करून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
प्रसंगी गावात योजना अगदी उत्कृष्टरित्या राबवले जातील याची ग्वाही व शाश्वती प्रसंगी पालक मंत्री महोदय यांना देण्यात आली नामदार पाटील यांनी देखील आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली योजना काटेकोर बद्ध व उत्कृष्टरित्या राबवावी असा सल्ला उपस्थितांना दिला
यावेळी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन दिलीप सिंग पाटील , सुभाष दादा कोळी , स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच आनंद ठाकरे, सरपंच पती विष्णू सोनवणे , माजी सरपंच सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश कोळी , कुंदन कोळी, अनिल सोनवाल, गजानन कोळी, आदींची उपस्थिती होती तसेच कंडारी गावातील डॉ. सूर्यभान पाटील( माजी सरपंच ) यशवंत चौधरी ( माजी उपसरपंच ) संदीप शिंगारे ( माजी सरपंच ) दीपक तायडे ( ग्रा.पं. सदस्य ) गौतम जोहरे (ग्रा.पं.सदस्य )
नंदू कोळी आदींची उपस्थिती होती



