भुसावळात हिंदुहॄदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध समाजपयोगी भरगच्च कार्यक्रमांनी संपन्न ; विविध राजकीय पक्ष व प्रतिष्ठित मान्यवरानी वाहिली आदरांजली;

भुसावळ – समस्त शिवसैनीकांचे आदरणीय गुरुतुल्य हिंदुहॄदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त आज भुसावळ शहर शिवसेनेतर्फे 23 जानेवारी रोजी विविध समाजपयोगी भरगच्च कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली . यानिमित्त लाडू वाटप, अन्नदान , औषधी वाटप , फळ वाटप व गरिब प्रसूत महिला व गरोदर माता यांना शिवसेनेतर्फे साडी चोळी व रोख रक्कम देवून सहकार्य करण्यात आले.
रविवार रोजी सकाळी 11 वाजता बाजार पेठ पोलीस स्टेशन शेजारी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ शिवसैनिक शरद जोहरे यांचे हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले . हिंदुहॄदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
, शिवसेना झिंदाबाद , आदीं गगनभेदी घोषणा देवून बाळासाहेब यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली . यावेळी लाडू वाटप करण्यात आले . यावेळी आमदार संजय सावकारे , माजी जिल्हाप्रमुख अँड जगदिश कापडे , उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे , जिल्हाप्रमुख समाधान महाजन ,सौ महाजन , प्रा उत्तम सुरवाडे , जि प गट नेता विश्वनाथ पाटिल , शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, शिवसेना शहर प्रमुख बबलु ब-हाटे , नीलेश महाजन , महिला आघाडी सौ पूनम ब-हाटे , मिलिंद कापडे , सूरज पाटिल , हेमंत ब-हाटे , नामदेव ब-हाटे ,यांचेसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .
यानंतर 125 गरिबा व गरजु नागरिकांना शिवभोजन तर्फे अन्नदान करण्यात आले. तसेच वृक्षारोपण, नगरपालिका दवाखान्यामध्ये आवश्यक असलेल्या (मेडिसिन ) औषधी देण्यात आल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी यांचेसह शिवसैनिक व शिवसेनाप्रेमी नागरिक उपस्थित होते .
दरम्यान जयंती निमित्त हिदुहॄदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्यावर आधारित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे हस्ते गायत्री जगदाळे हिला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देवून या स्पर्धेतील विजेत्यांना तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले . सदर कार्यक्रमांचे व स्पर्धेचे आयोजक शिवभोजन संचालक तथा जेष्ठ शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा ) यांनी शिल्ड , चांदीचा शिक्का व रोख रक्कम पारितोषिक देवून सहकार्य केले . विविध राजकीय पक्ष व प्रतिष्ठित मान्यवरानी वाहिली आदरांजली
हिंदुहॄदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सर्वपक्षीय मान्यवरांसह अनेकांनी आदरांजली वाहून अभिवादन केले .