बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध लाभार्थी कार्ड वाटप…

भुसावळ- भुसावळ शहर शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या तर्फे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जेष्ठ नागरिक, बालक, महिला शहरातील गरजू आरोग्य, ई-श्रम लाभार्थी कार्ड वाटप करण्यात आले. त्याआधी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर प्रमुख शिवसेना बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक दीपक भाऊ धांडे, निर्मल दायमा, युवासेना जिल्हा युवाअधिकारी चंद्रकांत शर्मा, तालुका युवाअधिकारी हेमंत ब-हाटे, शहर युवाअधिकारी सुरज पाटील, उपशहरप्रमुख पवन नाले, शहर उपसंघटक नबी पटेल, शरद जैसवाल, राजू भाऊ इंगळे, अमोल पाटील उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्वच शिवसैनिकांनी शिवसेनेच्या माध्यमातून गोर-गरीब महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक व कामगारांना हक्क मिळवून दिला आहे. समाजातील कोणताही वर्ग शासकीय लाभापसून वंचित राहू नये याची काळजी घेतली आहे असे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे याप्रसंगी म्हणाले.