साई निर्मल फाउंडेशनतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी .

भुसावळ :- स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून या देशाचे स्वातंत्र्य अखंड अबाधित राहावा म्हणून अविरतपणे निस्वार्थ पराक्रम करणाऱ्या कार्य करणाऱ्या, पराक्रमी भारताचे अभिमान असणारे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125वि जयंती साई निर्मल फाउंडेशन भुसावळ यांच्यातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून प्रभाग 22 मधील जेष्ठ नागरिक श्री आर के कोळी, श्री गणेश वाणी , साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष शिशीर दिनकर जावळे, राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे चंद्रशेखर पाटील, उपस्थित होते . याप्रसंगी संस्थाध्यक्ष शिशिर जावळे यांनी सुभाष चंद्र बोस यांचे स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी असणारे त्यांचे पराक्रम शौर्य याबद्दलच्या कथा कथन केल्या. व आजच्या युवा पिढीने भारताचे स्वातंत्र्य अबाधित रहावा असं वाटत असेल तर चुकून नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन असे प्रतिपादन यांनी आपल्या मनोगतातून यावेळी व्यक्त केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे प्रकल्प प्रमुख तथा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे चंद्रशेखर पाटील यांनी केले. तर आभार कपिल पहुरकर यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमास रेल्वे सेवानिवृत्त सोनवणे काका, जय भाई,, साहिल कासार, मोहन कासार उपस्थित होते.