पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने साकेगाव व कंडारी गावातील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार : साकेगाव ग्रामपंचायतीला ८ कोटी ६२.१५ लाख तर कंडारी येथे १७ कोटी ८९ लक्ष ९ हजार रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर ;


भुसावळ – शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत भुसावळ तालुक्यातील साकेगाव व कंडारी गावातील पाणी प्रश्न लक्षात घेऊन आमदार संजय सावकारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने कोट्यवधी रुपयांचा निधी तालुक्यातील गावांसाठी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचे साकेगाव व कंडारी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केलेले आहे.
साकेगाव येथे गेल्या कित्येक वर्षापासून गावातील पाईप लाईन जीर्ण अवस्थेत असल्यामुळे एमजीपी टू योजनेअंतर्गत दहा कोटी मंजूर करण्यात आले होते मात्र गावातील काही विघ्नसंतोषी राजकारणामुळे ते पैसे परत गेले त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने आमदार संजय सावकारे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून योजना रेनोवेशन साठी प्रयत्न केले
त्यावर आमदार संजय सावकारे यांनी सतत प्रशासनाला पत्रव्यवहार व पाठपुरावा करून भुसावळ तालुक्यात साकेगाव ग्रामपंचायत व कंडारी ग्रामपंचायतीला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यातील साकेगाव व कंडारी गावाचा जल जीवन मिशन योजनेत समावेश करून ती काल मंजूर देखील करून घेतलेली आहे या योजनेमुळे तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे असलेल्या साकेगाव व कंडारी गावातील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न पुढील शेकडो वर्षांसाठी मार्गी लागणार आहे या योजनेला नुकतीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच ही योजना कार्यान्वित होईल असा विश्वास भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केलेला आहे
आमदार संजय सावकारे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे साकेगाव कंडारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कमिटी सरपंच सदस्यांनी आभार व्यक्त केलेले आहे सदरील योजना आदर्शवत व उत्कृष्टरित्या गावात राबवली जाईल असे आश्वासन स्मार्ट विलेज ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहे