सुनसगाव शिवारात कंपनीत भिषण स्फोट दोन कामगारांचा होरपळून मृत्यू तर १ कामगार जखमी : आमदारांसह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची केली पाहणी !


भुसावळ – तालुक्यातिल सुनसगाव नजिक असलेल्या बेलव्हाळ रस्त्यावर असलेल्या दिया काॅपर कंपनीत केमीकल भरलेल्या लोखंडी पत्र्याच्या टाकीला वेल्डिंग करीत असताना अचानक स्फोट झाल्याने दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर एक कामगार जखमी झाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली तसेच आमदार व तहसीलदार तसेच अधिकारी व पदाधिकारी यांनी भेट देवून पाहणी केली.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की , सुनसगाव पासून एक किमी अंतरावर बेलव्हाळ रस्त्यावर सराफ नामक मालकाची कंपनी आहे ही कंपनी काही महिन्यांपूर्वी कमलाकर रामकृष्ण माळी रा सदाशिव नगर जळगाव यांनी भाडेतत्त्वावर घेऊन त्या ठिकाणी दिया काॅपर मास्टर अलायीस कंपनी नावाने तांब्याच्या तारांचे पाणी करून काॅपर प्लेटी तयार करण्याचे काम सुरू केले होते . मात्र दि २१ रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान येथील कंपनीचे कामगार खेमसिंग हेमलाल पटेल , काशिनाथ फतरु सुरवाडे आणि टुनटुन कुमार असे तीन कामगार फर्निश केमिकल आॅईल ने भरलेल्या लोखंडी पत्र्याच्या टाकीला वेल्डिंग करण्याचे काम करीत होते या वेळी टाकीत गॅस तयार झाल्याने अचानक पत्र्याची टाकीचा स्फोट झाला व आग लागली या आगीत कामगार खेमसिंग हेमलाल पटेल वय २३ रा .आत्मज गाढाहिल , लेमीतेरा ,सार्जी छत्तीसगड ह मु दिया काॅपर कंपनी व काशिनाथ फतरु सुरवाडे वय ४२ रा भुसावळ ह मु ज्ञानदेव नगर ,खेडी रोड जळगाव यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर टुनटुन कुमार रा बिहार ह मु दिया काॅपर कंपनी हा जखमी झाला .
भिषण स्फोट झाल्याची माहिती समजताच पत्रकार जितेंद्र काटे यांनी भुसावळ तालुका पोलीसांना तसेच परिसरातील सर्वांना माहिती दिली लागलीच गोंभी पोलीस पाटील वैशाली पाटील यांनी भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले त्यावेळी आग आटोक्यात आली साधारण एक तास अग्नितांडव सुरुच होते .
आमदारांकडून कंपनी मालकाची कानउघाडणी – घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे तसेच तहसीलदार दीपक धिवरे, माजी सभापती मनिषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी दिया काॅपर कंपनीचे मालक कमलाकर माळी यांची कानउघाडणी आमदारांनी केली केमिकल आॅईल असलेल्या ठिकाणी कोणी वेल्डिंग करतो काय ? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले तर तहसीलदार दीपक धिवरे यांनी तलाठी जयश्री पाटील यांना घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले .
पोलीसांची तात्काळ घटनास्थळी धाव – पत्रकार जितेंद्र काटे यांनी घटनेची माहिती देताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी मोठा जमाव जमला असल्याने पोलिसांनी घटनास्थळाचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब रुग्णवाहिका बोलवली मात्र कामगारांच्या मृतदेहाचा कोळसा झालेला असल्याने शेवटी मालवाहू वाहनांमध्ये दोन्ही मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले .
** आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्रथमोपचार – घटनास्थळी दाखल झालेल्या १०८ रुग्णवाहिकेतून आलेले डाॅ हानिफ शेख व चालक योगेश गायकवाड तसेच कंपनीच्या स्पोटाची माहिती मिळताच सुनसगाव उपकेंद्राचे सी एच ओ डॉ रुपेश पाटील आरोग्य सेवक दिपक कुमार दिक्षित आरोग्य सेविका विजया पाटील आरोग्य सहाय्यक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींवर प्रथमोपचार केले .
** विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट – वेल्डिंग करताना कंपनीत स्पोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी विज वितरण कंपनीचे अधिकारी भुसावळ विभागाचे अधिकारी श्री धांडे व सुनसगाव विजवितरण कार्यालयाच्या अभियंता देवयानी शेटे मॅडम यांना बोलावून घेतले यावेळी विज वितरण सुनसगाव युनिट चे सर्व विज कर्मचारी पुढील काही अनर्थ होऊ नये म्हणून घटनास्थळी दाखल झाले.
या घटनास्थळी परिसरातील गावांमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी कंपनीचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी समजते .
दरम्यान कंपनीच्या कामाबद्दल सर्व अनभिज्ञ –
येथील बेलव्हाळ रस्त्यावर सुरू असलेल्या दिया काॅपर कंपनीत काय चालते तसेच काय तयार होते या बद्दल येथील ग्रामपंचायत , तलाठी , पोलीस पाटील यांना काहीही माहिती नसल्याने या कंपनी पासून सर्व अनभिज्ञ असल्याचे समजते घटना घडल्या नंतर सर्व प्रकार समोर आला आहे .