जळगाव-भुसावळ 4 थ्या मार्गवरील पायाभूत सुविधांमध्ये वाढ : विभागात ४ तासाचा ब्लॉक घेऊन गर्डर बसविण्याचे काम पूर्ण ;

भुसावळ – मध्य रेल्वेने पायाभूत सुविधांच्या सुधारणांच्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवत, भादली -जळगाव चौथ्या मार्गावरील रेल फ्लायओवरचा (जळगाव – भुसावळ २४ किमी – चौथा मार्ग प्रकल्पाचा भाग) १०० मे.टन वजन असलेला ३०.५ मीटर लांबीचा ओपन वेब गर्डर दिनांक १२.१.२०२२ रोजी बसविण्यात आला.

मुख्य गर्डरला जोडलेल्या २१ मीटर लांबीच्या नोजसह मुख्य गर्डर एंड-लाँचिंग पद्धतीने बसविण्यात आले. गर्डर बसविण्याच्यावेळी सरकविण्यासाठी ५ तात्पुरत्या आधाराचे ट्रेसल्स उभारण्यात आले. गर्डरवरील ट्रॅक एच-बीम स्लीपरसह आधीच लिंक केलेला आहे. विभागात ४ तासाचा ब्लॉक घेऊन गर्डर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.