यावल – येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा प्रभार नेहा भोसले (आय ए एस.) यांनी परीक्षा विधिन गट विकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे .त्या यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदावर त्यांचा ४५ दिवस पदभार सांभाळणार असुन, नेहा भोसले ह्या मूळच्या सायन मुंबई येथील रहिवासी असून 2020 च्या कार्यकाळातील त्या आय. ए. एस. असून , वरिष्ठांच्या आदेशान्वये त्या त्यांच्या परीक्षा विधीत काळात आवास योजना स्वच्छ भारत जलसिंचन ,आणि माझी वसुंधरा, या योजनेकडे विशेष लक्ष देणार असल्याची माहीती त्यांनी दिली. आपण आपल्या कार्यकाळात शासकीय योजनांच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकासाचे लक्ष गाठणे हे आपले प्रमुख लक्ष राहणार असल्याचे सांगुन प्रशासनाच्या कार्यालयीन कामकाजात आपण बेशिस्त खपवुन घेणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना म्हटले आहे .



