भुसावळ – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ विद्यार्थी सुदर्शन लक्ष्मण वानखेडे शहरी सर्वसाधारण संवर्गातून 172 गुण मिळवून गुणवत्ता यादीत पात्र ठरलेला आहे. त्यानिमित्त संस्थेचे पालक बापूसाहेब मांडे तसेच संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळावा यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. राज्यभरातून लाखो विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात. त्यापैकी ९ ते १० हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. या परिक्षेत महाराणा प्रताप विद्यालयाचा विद्यार्थी सुदर्शन वानखेडे याने यश मिळविले. या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच स्पर्धात्मक विकास होण्यासाठी विद्यार्थांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ठ गुणांनी उत्तीर्ण होतात. आता या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परिक्षेत सुदर्शन वानखेडे याने यश संपादन केले असून, त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे


