धक्कादायक : संक्रांतीच्या सणाला जळगावात अल्पवयीन बालकाची आत्महत्या –

जळगाव : मकर संक्रांतीच्या सणालाच जळगावच्या कांचन नगर भागातील अवघ्या 13 वर्षीय बालकाने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यश रमेश राजपूत (13, कांचन नगर, जळगाव) असे मृत बालकाचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकलेले नाही.

बालकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ
शुक्रवार, 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास यश राजपूत या बालकाने राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्या करण्याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. मुलाचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात हंबरडा फोडला. या प्रकरणी जळगावच्या शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान, मयत यशचे वडील रमेश सुकलाल राजपूत (रा.कांचन नगर) हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदानचे काम करतात. मुलाने केलेल्या आत्महत्येने कुटुंबाला मोठा मानसिक आघात बसला आहे.