भुसावळ : शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोमवारी शहरात पून्हा नवीन 25 बाधीत आढळून आले. यात एकाच घरात पती, पत्नींसह मुलांनाही संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड, हनुमाननगर, सरस्वतीनगरातील पती-पत्नी, महात्मा फुले नगरातील आई-मुलगी आदींना कोरोनाची लागण झाली आहे. रेल्वे हॉस्पीटलचे वैद्यकिय अधिकारी देखील सोमवारी झालेल्या चाचणीत पॉझीटीव्ह आढळून आल्याने चिंता वाढली आहे. शहरात कोरोना वेगाने पसरत असतानाच नागरीकांकडून मात्र नियमांना तिलांजली दिली जात असल्याने प्रशासनाने गर्दी होणार्या आस्थापनांवर धडक कारवाई गर्दी मोहिम राबवण्याची अपेक्षा आहे.
या भागात आढळले रुग्ण
शहरात सोमवारी झालेल्या तपासणीत जगदीश नगर, म्युनिसीपल कॉलनी, खळवाडी भाग, पाटील मळा, लालबिल्डींग भाग, खडका चौक रजानगर, बालाजी टोल काटा परिसर, रामदेव बाबा नगर, सहकारनगर, यशोदा हॉटेल नगर मागील भाग, रेल्वेची कावेरी कॉलनी, हूडको कॉलनी, गांधी नगर, 15 बंगला, गजानन महाराज नगर, सिध्दी विनायक कॉलनी,रामायण नगर, शिवदत्तनगर, शांतीनगर, गोदावरी कॉलनी, सुंदरनगर व फालकनगर येथील रुग्ण आढळून आले तर सरस्वतीनगर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, हनुमान नगर भागात पतीपत्नी, महात्मा फुले नगर आई व मुलगी, गंगावाडी टिव्ही सेंटर पतीपत्नी व घरातील वयोवृध्द महिला, बंब कॉलनी पतीपत्नी व मुलगा बाधीत आढळून आले. बाधीतांमध्ये रेल्वे हॉस्पीटलच्या वैद्यकिय अधिकार्यांचाही समावेश आहे. सर्वच बाधीतांना सौम्य व मध्यम लक्षणे आहेत.
शहरात सोमवारी आढळून आलेल्या बाधीतांमध्ये बंब कॉलनीतील दहा वर्षीय बालक, महात्मा फुले नगरातील 10 वर्षीय बालिका, हूडको कॉलनीतील 16 वर्षीय तरुण व पिपल्स बँक कॉलनीतील 17 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. बाधीत आढळलेल्या या बालक व तरुणांमध्येही ताप, सर्दी, खोकला अशी सौम्य व मध्यम लक्षणे असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले.



