जळगाव – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जळगाव शहरासह भुसावळ कोरोना हॉटस्पॉट होत आहे. कोरोना रूग्ण संख्येत वाढ झाली असून मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल २२१ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर सहा जणांनी कोरोनावर मात केली जळगावसह भुसावळ हॉटस्पॉट यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात तसेच भुसावळ शहरात आढळून आले आहेत. म्हणून भुसावळ आणि जळगाव कोरोना हॉटस्पॉट झाले आहे.असे आढळले बाधितजळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण २२१ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात ४३, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ १०७, चोपडा ३२, पाचोरा ५, एरंडोल ५, पारोळा २, चाळीसगाव १४, मुक्ताईनगर १, बोदवड १ आणि इतर जिल्ह्यातील ७.



