भुसावळ – शहरातील एमआयडीसी परीसरात केमिकल फॅक्टरीला मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली

आगीचे स्पष्ट कारण अद्यापही स्पष्ट समजले नाही. मंगळवारी सकाळी कंपनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्यावर परिसरातील सुज्ञ नागरीकांनी भुसावळ नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला त्वरीत माहिती कळविली . त्यानुसार त्वरीत दीपनगर व भुसावळ पालिकेच्या बंबाने घटनास्थळी धाव घेतली. समजलेल्या माहीती नुसार रेल नीर प्रकल्पाजवळील एफ- 21 येथे केमिकल बनवणारी फॅक्टरी असून ती जळगावातील व्यापारी मयूर भोळे यांची असल्याचे समजते. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.


