मुंबई : कोरोनाचे विविध व्हेरीएंट आता समोर आल्यानंतर चिंता वाढली असताना अतिसार आणि रात्री घाम येणे ही सुद्धा कोरोनाची लक्षणे समोर आल्याने चिंता वाढली आहे. कोरोना विषाणू नव्या रूपात येऊन नागरीकांना बाधीत करीत असल्याने नागरीकांना सर्दी-पडसे, डोकेदुखी, अंगदुखी याशिवाय रुग्णांमध्ये इतर काही नवे लक्षणेही दिसून आल्याने तुम्हाला ही लखणे जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नका, तातडीने कोरोना चाचणी करून घ्या, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
या लक्षणांमध्ये समोर आला कोरोना
कोरोना विषाणू ज्या प्रकारे उत्पपीवर्तीत (म्युटेंट) होऊन नव्या रूपात समोर येत आहे, त्याच प्रकारे त्याची लक्षणेही बदलत आहेत. सर्दी, पडसे, ताप, डोके आणि अंगदुखी या लक्षणांसह आता कोरोनाबाधितांमध्ये नवी लक्षणेही दिसून येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढत आहेत. काही रुग्णांकडून अतिसार आणि रात्री घाम फुटणे अशा तक्रारीही येत आहेत त्यामुळे तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल किंवा रात्री घाम फुटल्याचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कोरोनाची चाचणी करून घ्या.

प्रत्येक वेळी लक्षणांमध्ये वाढ
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान कोरोनाबाधितांना सर्दी, पडसे, तापाची लक्षणे आढळत होती. ज्या रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला, त्यांच्यात अशा प्रकारची लक्षणे होती किंवा त्यांच्यात कोणतीही लक्षणे नव्हती.


