उपेक्षित मुलांच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री सिंधुताई सपकाळ! आदरांजली कार्यक्रमात प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांचे प्रतिपादन


भुसावळ – महाराष्ट्राच्या मदर तेरेसा अनाथांचा नाथ उपेक्षितांच्या तारणहार, आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत उपेक्षित मुलांसाठी समर्पित भावनेने आयुष्य जगणाऱ्या सिंधुताई सपकाळ होत्या.
असे प्रतिपादन भुसावळ कला विज्ञान आणि पु ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात आदरांजली वाहताना प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी केले.
सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली वाहण्यात या कार्यक्रमाचे आयोजन मिसलेनियस समिती, तर्फे करण्यात आले होते.. या आदरांजली च्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री महेश भाऊ फालक , डॉ. प्राचार्य मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस व्ही पाटील, उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे, पर्यवेक्षक प्रा श्रीमती शोभा तळेले. समन्वयक प्रा टी.एस सावंत, समन्वयक प्रा आर एम खेडकर, समन्वयक स्वाती पाटील, समन्वयक प्रा एन वाय पाटील, प्रा एस बी पाटील, प्रा महेश गोसावी, एन.एस.एस.च्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री भंगाळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा महेश सरोदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन भाऊ फालक, संस्थेचे सचिव विष्णू भाऊ चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमार जी नहाटा, व संचालक मंडळ, उपप्राचार्य डॉ. बी एच बऱ्हाटे, डॉ. ए.डी गोस्वामी , डॉ. एन ई भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी वृंद, प्रा एल पी टाक, प्रा प्रशांत पाटील, श्री मुकेश फिरके, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.