दीपनगरजवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक : वृद्धाचा जागीच मृत्यू :

दीपनगर : दीपनगर प्रकल्पाजवळ भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीवरून जाणार्‍या वृद्धाला धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, 5 रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास झाला. संतोष निकाळजे (65, झेडटीआरएस, भुसावळ) असे या अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव असल्याचे समजते. कुटुंबियांना याची माहिती कळताच त्यांनी धाव घेत मोठा आक्रोश केला. या अपघाताबाबत भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.