भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भुसावळ पोलिस विभागाच्या वतीने महाविद्यालयात “सोशल मीडिया आणि आपली जबाबदारी” ह्या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी मंचावर अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे, शहर पोलिस स्टेशनचे एपीआय विनोदकुमार गोसावी, सायबर क्राइम सेलचे पीएसआय गणेश कोळी, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी इत्यादि उपस्थित होते.
सायबर क्राइम सेलचे पीएसआय गणेश कोळी यांनी “फेक न्यूज चुकीच्या पोस्ट खातरजमा न करता करण्यात येणार्या. शेयरिंग मुळेच पसरतात आणि यामुळेच सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तणाव वाढून तेढ निर्माण होते. सोशल मीडिया ही अपरिहार्य बाब असली तरी त्याच्या सुयोग्य वापराचे ज्ञान आणि भान अंगी बाणत सारासार विवेक वापरुन आपण ह्याचा सुयोग्य वापर करणे ही आजची गरज आहे.” असे सांगितले तर एपीआय विनोदकुमार गोसावी यांनी “सध्याच्या माहिती युगात सोशल मीडिया च्या माध्यमातून सगळ्यांवर प्रचंड महितीचा मारा होऊन राहिला आहे. ह्या माध्यमातून बरीच खोटी आणि फसवी माहिती सुद्धा आपल्या पर्यन्त येत असते. सामाजिक माध्यमातून निर्माण होणार्या माहितीच्या अफाट मार्यादतून योग्य माहिती ग्रहण करण्यासाठी सदसदविवेकबुद्धी वापरणे अत्यंत गरजेचे असते.” असे प्रतिपादन केले.
अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी अभियंत्यांनी तंत्रज्ञान निर्मितीबरोबरीनेच समाज, देश आणि जगाला जोडून ठेवण्यासाठी कार्यरत असावे असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. प्रा. आय.डी. पॉल, डॉ.श्रीकांत चौधरी यांनी आयोजनात भुमिका बजावली.
सदर मार्गदर्शन वर्गात सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींनी सहभाग नोंदविला.
हिन्दी सेवा मंडळाच्या सचिव श्रीमती एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड यांनी ह्या उपक्रमाचे कोतूक केले.



