भुसावळ – तहसिल कार्यालय येथे आज 24 डिसेबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला
दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे यांनी भुषविले.तहसिलदार दिपक धिवरे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्र.ह.दलाल जिल्हा संघटक ग्राहक पंचायत महाराष्ट्र, ॲड.सौ.जास्वंदी भंडारी(पाटील) जिल्हा सचिव ग्राहक कल्याण फाऊंडेशन ,कु.उज्वला बागुल तालुकाध्यक्ष ग्राहक कल्याण फाऊंडेशन, ॲड कल्पना टेमाणी तालुकाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत हे उपस्थित होते.
ग्राहकांची बरेचदा फसवणूक होत असते ही फसवणूक होवू नये म्हणून ग्राहकांनी कोणतीही वस्तू किंवा सेवा घेतांना जागरूक व सर्तक असावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
प्रमुख पाहुणे प्र.ह.दलाल यांनी वजन मापांमधून कशी फसवणूक होते याविषयी सविस्तर माहिती दिली व ग्राहक जागृती ही तळागाळातील सर्व ग्राहकांमधून व्हावी .ग्राहक दिन फक्त फोटो व बातम्यांपुरता मर्यादित न राहता खर्या अर्थाने “जागो ग्राहक जागो” अभियान राबविले गेले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन हा “कन्झूमर_ नो युवर राईट” ही संकल्पना समोर ठेवून साजरा करायचा असल्याने त्यावर थोडा प्रकाशझोत टाकत ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील ग्राहकांना असणारे अधिकार व तरतुदी याविषयी सविस्तर माहिती ॲड.जास्वंदी भंडारी यांनी दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक भुसावळ तहसीलदार मा. दिपक धिवरे यांनी केले.प्रास्ताविक व सुत्रसंचालन श्री.भगवान शिरसाठ यांनी केले.कार्यक्रमाला नायब तहसीलदार शशीकांत इंगळे, नायब तहसीलदार अंगत आसदकर, नायब तहसीलदार शोभा घुले, पुरवठा निरीक्षक विजय पाटील व ग्राहक हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डी.आर पाटील, रुपाली गुरव,प्रिसीला डेविड व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.



