उघड्यावर कुडकुडणाऱ्यांना दिली मायेची ऊब : कडाक्याचे थंडीत कांबळ वाटप : ललवाणी फौंडेशन परिवार व सखी श्रावणी महीला बहुउद्देशिय संस्थेचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – येथील स्वर्गिय स्वप्निल ललवाणी यांचे स्मृति प्रित्यर्थ ललवाणी परिवार व सखी श्रावणी महीला बहुउद्देशिय संस्थेतर्फे रस्त्यावर बसेरा करणारे
गोर गरीब, गरजू यांना कांबळ वाटप करून मायेची ऊब दिली .सध्या शहराच्या तापमानात घसरण झाली असून हवेत मोठ्या प्रमाणावर गारठा पसरला आहे . या कडाक्याच्या थंडी पासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून
रात्रीचे अंधारात सर्व सख्या व ललवाणी परिवार यांनी एक छोटासा प्रयत्न करुन कांबळ वाटप केले.
भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन पासुन कांबळ वाटपाची सुरुवात भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दिलिप भागवत यांचे हस्ते करण्यात आली .या वेळी त्यांनी या ऊपक्रमाचे कौतुक करुन महीलांचा ऊत्स्फ्रुर्त सहभागाची वाखाणणी केली.
छ.शिवाजी महाराज व्यापारी संकुल,सातारा ब्रिज , मॉर्डन रोड ते रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याने उघड्यावर झोपलेले होते अशा गरीब गरजुना कांबळ वाटप करण्यात आली .
स्व .स्वप्निलला भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली यावेळी सौ.शोभा ललवाणी,
सौ.निता छेडा,नितीन छेडा, भरत कोळी,फाल्गुनी कोळी, सुनील हेडा,ऊमेश नेवे,
प्रा.डाॅ.दिलीप ललवाणी, ललवानी फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्या
सखी श्रावणी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ राजश्री नेवे, माया चौधरी, वंदना झांबरे, पत्रकार उज्वला बागुल , अनुराधा टाक, अराधना टाक, अनिता कोळी, कल्पना बुंदले, चारू महाजन, भाग्यश्री नेवे, कल्पना नेवे,यांचेसह सदस्या सहभागी झाल्या होत्या .