पुणे : आखाडा चालक असलेल्या पैलवानाची जुन्या वादातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ घडली. नागेश सुभाष कराळे (38, रा.शेलपिंपळगाव, ता.खेड, जि.पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले आहे. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाले आहेत.

जागेवरच झाला मृत्यू
हल्लेखोराने नागेशला 6 गोळ्या झाडल्या. यामधून दोन गोळ्या त्याच्या डोक्यातही लागल्या आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. नागेश आपल्या कारमध्ये बसला होता तेव्हाच त्याच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.
उपचारापूर्वीच झाला मृत्यू
नागेश कराळे हे आपल्या चारचाकी वाहनात बसत असताना लगतच फोर्ड फिगो वाहनात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेशवर चार गोळ्या झाडल्याचे समजते. या घटनेत नागेश गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांची मयत झाल्याचे घोषित केले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी दाखल धाव घेऊन पाहणी केली. हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिसांची चार पथके रवाना झाली असून काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.


