भुसावळ: दीपनगर येथील सुरक्षा रक्षक काम आटोपून घरी जात होते. यावेळी चारचाकी वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दि. २३ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास फेकरी उड्डाणपूलवऱ घडली.
दीपनगर केंद्रातील सुरक्षा रक्षक कैलास श्यामसिंग पाटील (वय ५०) व राहुल दिलीप पाटील (वय ३४, राहणार खडका) हे दोघे दुचाकीवरून ड्युटी करून घरी खडका (ता.भुसावळ) येथे जात होते. यावेळी फेकरी उड्डाणपुलावर समोरून येणाऱ्या चारचाकी क्रमांक (१५.बी डब्ल्यू ५६९७) या गाडीने जोरदार धडक दिली. यात दुचाकी क्रमांक (एम एच१९ डीडी ४८३६) हे वाहन दूर फेकले गेले. या दुचाकीवर असलेले कैलास शामसिंग पाटील हे उड्डाणपुलावरून खाली फेकले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला व राहुल पाटील हा गंभीर जखमी असून रुग्णालयात दाखल करण्यात आले.



