भुसावळ - कंडारी येथील सरपंच अनुसूचित जमातीसाठी राखीव होते त्यानुसार याच प्रवर्गातून सदस्य म्हणून निवडून आलेले दिपक रमेश तायडे हे एकमेव सरपंच पदाचे दावेदार असतांना सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या सौ.सुवर्णा नितीन कोळी यांचेकडे जमातीचे प्रमाणपत्र असल्याने. त्यांनी सुध्दा या पदावर दावा करत. दि.17/2/2021रोजी येथे सरपंच निवडणूक होऊन सौ.सुवर्णा कोळी ह्या 8 विरुद्ध 9 मतांनी विजयी झाल्या.
त्याआधी दि. 15/2/2021रोजी ग्रामपंचायत सदस्य श्री. दिपक रमेश तायडे यांनी कंडारी सरपंच सौ.सुवर्णा नितीन कोळी यांचा जमातीच्या दाखल्या विरोधात
पडताळणी समिती, नंदुरबार यांचेकडे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पडताळणी साठी हजर राहण्याच्या समितीने काढलेल्या नोटिसा दोघांना दि.22/12/2021 रोजी मिळाल्या. त्यांना दि. 28/12/2021 या दिवशी नंदुरबार येथे समितीच्या कार्यालयात सुनावणी साठी हजर राहण्याचे कळविले आहे.
त्यामध्ये लिहिले आहे की.सुवर्णा शांताराम सोनवणे (वडिलांकडचे नांव)यांनी पडताळणीसाठी सादर केलेल्या दि.21/6/1986 ,रोजीच्या जमात दाखल्याची दक्षता पथकाने, तहसीलदार जळगांव यांचेकडे चौकशी केली असता.तहसिलदार यांनी पत्राद्वारे कळविले की सदर दाखल्याची आमचेकडे नोंद आढळून येत नाही.तसेच आपला जन्म दि.30/3/1987असा असून प्रमाणपत्र दि.21/6/1989 रोजी निर्गमित केल्याचे दिसून येत आहे.सबब आपण सादर केलेले जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे दिसून येते.
तसेच आपला दावा खोटा ठरल्यास आपणास मिळत असलेले सर्व लाभ काढून घेतले जातील.
तसेच आपण सुनावणी साठी हजर न राहील्यास समिती पुढील निर्णय पारीत करेल याची नोंद घ्यावी.
नोटीस सोबत पोलिस दक्षता पथकाचा अहवाल तसेच तहसीलदार जळगांव यांचे पत्र जोडले आहे.जमातीचा दावा खोटा ठरल्यास सर्व लाभ काढून, प्रसंगी गुन्हा सुध्दा दाखल होशक्यतापडताळणी समिती, नंदुरबार यांचेकडे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पडताळणी साठी हजर राहण्याच्या समितीने काढलेल्या नोटिसा दोघांना दि.22/12/2021 रोजी मिळाल्या. त्यांना दि. 28/12/2021 या दिवशी नंदुरबार येथे समितीच्या कार्यालयात सुनावणी साठी हजर राहण्याचे कळविले आहे.
त्यामध्ये लिहिले आहे की.सुवर्णा शांताराम सोनवणे (वडिलांकडचे नांव)यांनी पडताळणीसाठी सादर केलेल्या दि.21/6/1986 ,रोजीच्या जमात दाखल्याची दक्षता पथकाने, तहसीलदार जळगांव यांचेकडे चौकशी केली असता.तहसिलदार यांनी पत्राद्वारे कळविले की सदर दाखल्याची आमचेकडे नोंद आढळून येत नाही.तसेच आपला जन्म दि.30/3/1987असा असून प्रमाणपत्र दि.21/6/1989 रोजी निर्गमित केल्याचे दिसून येत आहे.सबब आपण सादर केलेले जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे दिसून येते.
तसेच आपला दावा खोटा ठरल्यास आपणास मिळत असलेले सर्व लाभ काढून घेतले जातील.
तसेच आपण सुनावणी साठी हजर न राहील्यास समिती पुढील निर्णय पारीत करेल याची नोंद घ्यावी.
नोटीस सोबत पोलिस दक्षता पथकाचा अहवाल तसेच तहसीलदार जळगांव यांचे पत्र जोडले आहे.जमातीचा दावा खोटा ठरल्यास सर्व लाभ काढून, प्रसंगी गुन्हा सुध्दा दाखल हो