स्व. स्वप्निल ललवाणी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा :


भुसावळ — येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी .एम. ललवाणी यांचे कनिष्ठ सुपुत्र स्वप्नीलचे नुकतेच एका वर्षापूर्वी निधन झाले होते. त्या दुःखातून ते अजूनही सावरलेले नाहीत. मात्र त्याच्या प्रित्यर्थ जे काही सामाजीक,शैक्षणीक,धार्मिक कार्यक्रम, जे काही दान करता येईल वा चांगल्या गोष्टी करता येतील असे कार्य ललवाणी परीवार करीत आहे.
त्याचा वाढदिवस सुद्धा त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला .त्याच्या निधनानिमित्त प्रा.डाॅ. ललवाणी यांनी स्वलिखित एक पुस्तक प्रकाशित केले व त्या पुस्तकाचे नाव सुद्धा अनोखे आहे. घरट्यातून आकाशाकडे या नावात दोन अर्थ दडलेले आहेत. पहिला अर्थ म्हणजे स्वप्नील हा घरट्यातून आकाशाकडे गेला म्हणजेच तो देवाला प्रिय झाला. दुसरा अर्थ त्या पुस्तकातील लेखाला साजेसं म्हणजे प्रा.डाॅ. ललवाणी यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात 32 वर्षाच्या सेवेत असंख्य मुलींना घडविले त्यांच्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील 32 मुलींचे भुसावळ म्हणजे माहेर तर आकाश म्हणजे सासर म्हणजे त्या घरट्यातून आता आकाशाकडे म्हणजेच फार मोठ्या पदावर ,फार मोठे कर्तुत्ववान कार्य त्या करीत आहे व त्याचा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. हे पुस्तक स्वप्नीलला अर्पण करण्यात आलेले असून ‘स्वप्निल एक स्वप्न , हा सुद्धा लेख यामध्ये आहे त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालय, दे.ना. भोळे महाविद्यालय ,नारखेडे महाविद्यालय व डी एल हिंदी महाविद्यालय तसेच भुसावळ हायस्कूल, डी. एस .हायस्कूल, के नारखेडे विद्यालय, सु.ग. टेमाणी विद्यालय,डि.एल. हिंदी विद्यालय या विद्यालयात त्यांनी त्या पुस्तकांच्या प्रती व दिपावली अंक प्रत्यक्षपणे जाऊन विनयतेने प्राचार्यांना सादर केल्या. प्राचार्य सौ. एम.व्ही. वायकोळे, प्राचार्य आर. पी. फालक ,प्राचार्य रमेश जोशी,उपप्राचार्य श्रीवास तसेच मुख्याध्यापक प्रा. मनोज माहेश्वरी, प्रा. प्रमोद शुक्ला, प्रा. एम.टी सपकाळे प्रा. साहानी, प्रा. एन.बी .किरंगे आदींनी या उपक्रमाचे कौतुक करून आमच्या माहितीतील पहिला प्राध्यापक की जांन्यी विद्यार्थिनींवर पुस्तक लिहिले असे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत त्यांचे बंधू श्री. नलीन ललवाणी हे होते.