भुसावळ – माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे पत्नी सौ मंदाकिनीताई खडसे यांच्यासह देवदर्शनासाठी कलकत्ता येथे नुकतेच रवाना झाले असून. गुरुवार रोजी त्यांनी कलकत्ता येथे पोहोचल्यानंतर पुरातन देवस्थानातील कालिकामातेचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले.
दरवर्षी खडसे हे परीवारासोबत देवदर्शनार्थ जात असतात या पार्श्वभूमिवर यंदा त्यांनी पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील कालिकामातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
प्रसंगी भक्ती आणि शक्तीचे द्वार असलेल्या कालिकामातेचे दर्शन घेताना माजी मंत्री खडसे यांनी देशावर आलेले कोरानाचे संकट दूर होण्यासाठी देवीला साकडे घातले. सर्वांना शक्ती आणि बुद्धी दे तसेच सर्वांच कल्याण होण्यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली. यावेळी मंदाताई खडसे, गोवर्धन जगवाणी, नगरसेवक प्रा.सुनील नेवे, विनीता नेवे, अटल नेवे आदींची उपस्थिती होती.
यावेळी त्यांचे समवेत सौ मंदाकाकू खडसे ,गोवर्धन जगवाणी,सौ विनीता नेवे, प्रा.सुनील नेवे,अटल नेवे उपस्थित होते .



