जळगाव – नुकत्याच मतदान पेटीत बंद झालेल्या बोदवड नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांनी बोदवड नगरी दणाणली खरी परंतु ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महिला भगिनी यांची मानहानी करणे ही संस्कृती छ. शिवरायांच्या नावाने कार्यरत असलेल्या शिवसेनेची नाही असे परखड आणि स्पष्ट मत शिवसेनेचे भुसावळ विभाग जिल्हाप्रमुख समाधान महाजन (सर) यांनी व्यक्त केले . मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या आरोपांची सांगता जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून केले .
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज २३ रोजीजळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख समाधान महाजन (सर ) यांच्या नेतृत्वाखाली आपल्या वरील आरोप प्रत्यरोपांचे खंडन करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. याप्रसंगी पत्रकारांशी व माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले की, मी सेनेचा जिल्हाप्रमुख या नात्याने बोदवड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक प्रचार कार्यात वरिष्ठांच्या आदेशाने गेलो होतो. मी व माझा परिवार हेही वारकरी संप्रदायाचे पाईक असताना सन्माननीय एड.रवींद्र पाटील जे आमचे आदरणीय आहेत,आणि रोहिणी ताई खडसे खेवलकर हे कोणत्याही पक्षात जरी काम करत असले तरी महिला व जेष्ठ नागरिक यांची साधी मानहानी करणे ही आमची संस्कृती नाही, आणि आपापल्या पक्षांची वाढ करणे प्रचार-प्रसार करणे हा प्रत्येक पक्ष संघटनेचा अधिकार आहे. तसा तो आमचा आहे.पक्षश्रेष्ठींनी सांगितल्या प्रमाणे महा विकास आघाडी चा धर्म आम्ही पडतो म्हणून आंम्ही महायुतीशी एकनिष्ठच राहू, सोन्यासारख्या संबंधांची माती कधी करणार नाही व नाती तोडणारही नाही. आणि जेष्ठानी सांगितले तर संघटनेच्या शत्रूंना मोकळे ही सोडणार नाही. आम्ही बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत कायद्याचे उल्लंघन केलेले नाही किंवा निवडणूक केंद्राच्या हद्दीत पक्ष चिन्हाचे असलेले वाहन मिरवले नाही,तसा एकही पुरावा आमच्याविरुद्ध नाही. आदरणीय रवींद्र भैय्या यांनी नव्यांना खूष करण्यासाठी जुन्या संबंधांची माती करण्यात अर्थ नाही,म्हणून एखाद्या ला खुष करण्या साठी व महा विकास आघाडीतील ओळख पुसण्यासाठी आक्रस्ताळेपणा करणे हे आमचे धोरणही नाही. माननीय एड. रवींद्र पाटील यांना सेनेच्या नजरेत सन्मान होता आणि आहे व राहील. म्हणून अशा निरुपद्रवी माणसास सेनेच्या वाघाने छेडण्याचे कारण ही नाही.आमचे धोरण तर असे आहे की,”तुका म्हणे हवे तर देऊन कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू दोन दोन काठी म्हणून नाठाळाची जरी भैय्यासाहेबांना शिकवण असली,तरी सज्जनास त्रास देणे किंवा धक्काबुक्की करणे हे सेनेच्या धोरणात आणि भाषेतही नाही.असे परखड मत आपल्यावर होत असलेल्या धक्का बुक्कीच्या आणि गुंडागर्दी च्या आरोपांना आज समाधान महाजन यांनी प्रसार माध्यमांसमोर दिले.याप्रसंगी शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते छोटू भोई उपजिल्हा प्रमुख संघटक विलास जी मुळे जिल्हा नियोजन समिती सदस्य एडवोकेट मनोहर खैरनार, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख मुक्ताईनगर सुनील पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भुसावळ संतोष सोनवणे,विधानसभा संघटक प्राध्यापक धीरज पाटील,कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक उत्तम सुरवाडे, पंचायत समिती सदस्य भुसावळ विजय सुरवाडे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, उपसंघटक सईद मुल्ला वरणगाव,जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा, उपजिल्हा संघटक असलम भाई शेख नगराध्यक्षांचे पती सईदभाई बागवान नगरसेवक सलीम कुरेशी भुसावळ शहर प्रमुख निलेश महाजन मुक्ताईनगर शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे एडवोकेट कैलास लोखंडे आणि दळवी बोदवळ मुक्ताईनगर व भुसावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते घोषणा देत थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले या निवेदनावर सर्वांच्या साक्षर्या आहे.या सर्व प्रकारामुळे बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निमित्ताने कोणताही पुरावा,फुटेज नसलेल्या घटनेच्या कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याप्रसंगी हरकत न घेतलेल्या धक्का बुक्कीच्या भुताला व एक प्रकारे शिवसेनेने महाविकास आघाडीत फूट पाडणाऱ्यांना मुठ मातीच दिली,अशा प्रतिक्रिया या प्रसंगी नागरिकातून व्यक्त होत होत्या.



