नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा :


भुसावळ – नाहाटा महाविद्यालयाच्या ए- 36 कॉन्फरन्स हॉल यथे श्रीनिवास रामानुजन अय्यंगर यांचा 134 वा जन्मदिवस ‘राष्ट्रीय गणित दिवस’दिनांक 22/12/2021 रोजी विद्यालयाच्या गणित विभागातर्फे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस्. व्ही. पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. पी.एच इंगोले (इतिहास विभाग, नाहाटा महाविद्यालय) हे उपस्तित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख प्रा. ए.पी नवघरे यांनी केले.
त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. पी.एच इंगोले यांनी रामानुजन यांचे चरित्र , संशोधन, रामानुजन मॅजिक बॉक्स, रामानुजन सम, डायफंटाईन इक्वेशन, माॅक थिटा फंक्शन, कंटिन्यूड् फ्रॅक्शन, नंबर थेरी, रामानुजन नंबर 1729 या विषयावर चर्चा केली तसेच रामानुजन यांच्या बालपणातील काही किस्से सांगून बालपणातच त्यांची बुद्धी गणितात किती तल्लख होती याचे काही उदाहरणे सादर केली. तसेच रामानुजन यांच्या कालीन व संपर्कातील विविध गणित तज्ञ जी .एच .हार्डी , कार, लिटिल गुड यांचे रामानुजन विषयीचे विचार मांडले.तसेच रामानुजन हे इतर गणित तज्ञां पेक्षा कसे सरस होते हे उदाहरणासह स्पष्ट केले.
यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस्. व्ही. पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात रामानुजन यांच्या जीवनातील उदाहरण सांगून रामानुजन हे रॉयल सोसायटी ऑफ लंडन इथली फेलोशिप मिळवणारे सर्वात कमी वयातील गणितज्ञ होते हे स्पष्ट केले. तसेच त्यांनी गणिताचे जीवनातील महत्त्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राध्यापक प्रणिता राणे यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. डॉ. एस .व्ही .पाटील, प्रा. डॉ. बी.एच . बऱ्हाटे प्रा. डॉ. ए. डी .गोस्वामी, प्रा.डॉ.एन.ई.भंगाळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रा. डाॅ.के. के. अहिरे ,प्रा डॉ. जे. एफ .पाटील प्रा. डॉ. पी .ए. अहिरे, प्रा. व्ही. ए. सोळुंके, प्रा. डॉ. दीपक शिरसाट , प्रा. उज्वला महाजन ,प्रा.भारती सोनवणे, प्रा. वंदना महाजन, प्रा. डॉ .राजेंद्र तायडे , प्रा.डॉ. ललित तायडे हे प्राध्यापक आणि 43 विद्यार्थी हजर होते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास गणित विभागातील प्रा. प्रणिता राणे, प्रा. नेहा महाजन, प्रा.काजल वारके, प्रा.अनिकेत शिरोडे, प्रा.रुची भावसार, प्रा.तुबा देशमुख यांनी परिश्रम घेतले.