पदवीधरांच्या प्रश्नांना नेहमी प्राधान्य -आ. डॉ सुधीर तांबे :


रावेर : येथे नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे विधानपरिषद सदस्य आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत पदवीधर मेळावा संपन्न झाला. रावेर शिक्षण संवर्धक संघ रावेर संचालित सौ के एस ए गर्ल्स हायस्कूल जिमखाना हॉलमध्ये सदर मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री जे के पाटील सर होते. मेळाव्यात परिसरातील संस्थाचालक मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पदवीधर, वकील मंडळी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रा. प्रकाश मुजुमदार सर यांनी केले. त्यांनी रावेर तालुक्यातून येत्या पदवीधर निवडणुकीत जास्तीत जास्त नोंदणी करताना सुमारे पाच हजार पदवीधरांची रावेर परिसरातून नोंदणी करणार असे सांगितले.पदवीधरांच्या मेळाव्यात संस्थाचालक मा श्री राजीव पाटील (अध्यक्ष भगवती शिक्षण प्रसारक मंडळ रावेर), श्री रवी पवार (अध्यक्ष स्वामी शिक्षण संस्था रावेर) ,श्री दिलीप अग्रवाल (अध्यक्ष शिवप्रतिष्ठान रावेर) यांनी आपल्या मनोगतात शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या मांडल्या. विविध शैक्षणिक सामाजिक संघटनांनी आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. पदवीधर आमदार डॉ सुधीर तांबे यांनी मनोगतातून सांगताना शासनाकडून शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या जुनी पेन्शन योजनेचा पाठपुरावा सुरू आहे, पवित्र पोर्टल उठवून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी विधानपरिषदेत आवाज उठवणार, शिक्षक शिक्षकेतर यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून होण्यासाठी प्रयत्नशील आहे, संस्थाचालकांना वेतनेतर अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रलंबित वैद्यकीय बीले थकीत बिले पी एफ बीले लवकरच शासनाकडून निधी मिळवून मंजूर होणार यासह अनेक समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी याप्रसंगी अहमदनगर जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री चांगदेव खेमनर नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष श्री कन्हैयालाल अग्रवाल, उपाध्यक्ष श्री अशोक वाणी संचालक शितल वाणी श्री विकास देशमुख डॉ पी टी पाटील,डॉ दत्‍तप्रसाद दलाल, प्रा डी एस चौधरी,ग स सो माजी संचालीका सौ कल्पना दिलीप पाटील डॉ सुभाष पाटील ,हरीश गनवाणी माजी नगराध्यक्ष उपस्थित होते पदवीधर मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सरदार जी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री शिरीष वाणी, सौ के एस ए गर्ल्स हायस्कूल चे प्रभारी मुख्याध्यापक श्री जयंत कुलकर्णी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश रमेश राणे यांनी केले आभार प्रदर्शन प्रा बी एल सरोदे यांनी मानले पदवीधर मेळाव्यानंतर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी रावेर वकील संघ व रावेर तालुका काँग्रेस कमिटी येथे सदिच्छा भेट दिली