भुसावळ – तालुक्यातील हतनुर तळवेल पिंपरी सेकम या फिडरवर शेतकऱ्यांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याने शेतकरी अडचणीत आले आहे रब्बी पिकाला पाणी देऊ शकत नसल्याने बुधवार 21 रोजी वरणगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा आणला होता व तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन देण्यात आले

वरणगाव परिसरातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज जोडणी कंपनीने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता खंडित केला आहे यामुळे रब्बी हंगामातील केळी ऊस कांदा मका भाजीपाला हरभरा गहू या पिकांना पाणी दिले जात नसल्याने सदरचे पिकाचे नुकसान होणार आहे यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत अडकलेला आहे गेल्या काही दिवसांपासून बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आता रब्बी हंगामात सदरचा नुकसान भरपाई होण्याची प्रयत्न करत आहे त्यात कृषी पंपाची वीज जोडणी तोडल्यामुळे पिकांना पाणी दिली जाऊ शकत नाही याकरता आज शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा आणून उपकार्यकारी अभियंता तुषार गांजरे यांना तात्काळ सदरची वीज जोडणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला यासाठी उपकार्यकारी अभियंता तुषार गांजरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनाला सरपंच प्रशांत पाटील माजी जी प सदस्य राजेंद्र चौधरी सचिन इंगळे मधुकर पाटील सुरेश महाजन विलास पाटील गुडडू कोळी गोपाळ कोळी आकाश झांबरे रामराव पाटील तसेच परिसरातील सर्व शेतकरी हजर होते


