हिन्दी सेवा मंडळाच्या वतीने श्री संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथि साजरी :

भुसावळ- येथील हिन्दी सेवा मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे आद्य संत व थोर समाजसुधारक श्री संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात तापी नदीकिनार्यालवर हिन्दी सेवा मंडळाने श्री संत गाडगे बाबांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य व रमणीय स्मृतिस्थळ शांतिधाम या नावाने विकसित केले आहे. ह्याच शांतिधाम आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात श्री संत गाडगे बाबांना अभिवादन करत अत्यंत साधेपणाने पुण्यतिथि साजरी करण्यात आली.
सदर प्रसंगी हिन्दी सेवा मंडळाच्या सचिव श्रीमती एम.डी.शर्मा यांनी समाजाला श्री संत गाडगे बाबांच्या शिक्षणातून वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक विकास आणि त्यातून मग राष्ट्र उद्धार या विचारांची अधिक गरज असल्याचे सांगितले. अंधश्रद्धामुक्त सशक्त आणि साक्षर समाज घडवण्यासाठी श्री संत गाडगे बाबांनी केले महनीय कार्य म्हणजे अखिल मानवजातीवरील उपकार असल्याचे त्यांनी ह्या प्रसंगी सांगितले.
अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालय महान कर्मयोगी राष्ट्रसंत श्री गाडगे बाबांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाज उत्कर्षाचा वसा पुढे चालवत असल्याचे सांगितले.
हिन्दी सेवा मंडळाचे कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, बिसेन अग्रवाल, रमेश नागराणी, संजय नाहटा, पंकज संड, आरती भारद्वाज, हिन्दी सेवा मंडल संचलित विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख तसेच कर्मचारीवृंद ह्याची ह्या प्रसंगी उपस्थिती होती.