जळगाव : महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सोमवारी सकाळी जळगाव येथे आगमन झाले. यावेळी जळगावकर नागरीकांच्यावतीने महापौर जयश्री सुनील महाजन यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. येऊ घातलेल्या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात व मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग आकाराचे विशेष पुष्पगुच्छही दिले. यावेळी माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, नाशिक विभागाचे आईजी बी.जी. शेखर पाटील साहेब उपस्थित होते.

चोपडा व जळगाव शहरात विविध कार्यक्रम
राज्याचे गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील हे सोमवार, २० डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहे. चोपडा येथील नगरपरीषद येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन, दुपारी १२ ते १ चोपडा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत होईल. दुपारी २ वाजता चोपडा तालुका सहकारी सुतगिरणीचे जिनींग व प्रेसिंग प्रकल्पाने भूमीपूजन समारंभ होणार आहे. दुपारी ३.१५ ते ४.१५ दरम्यान जळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या शासकीय निवासस्थानांच्या नवीन इमारतीचे उद्घाटना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते होईल शिवाय ४ ते ५.३० दरम्यान पोलीस अधिक्षक कार्यालयात नाशिक परीक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था तसेच इतर विषयांच्या अनुषंगाने विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्यासोबत बैठक होणार आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३० शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे राखीव असून सायंकाळी ७ वाजता जळगाव विमानतळावरून विमानाने मुंबईकडे रवाना होतील.


