जळगाव : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे सोमवार, २० डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत चोपडा व जळगाव शहरात विविध कार्यक्रम होणार आहे. जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात दौरा प्राप्त झाला आहे
राज्याचे गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील हे सोमवार, २० डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सुरूवातीला सकाळी ८.५० जळगाव विमानतळावर आगमन होणार असून तेथून थेट चोपडा येथील नगरपरीषद येथे सकाळी १० वाजता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करतील तर दुपारी १२ ते १ चोपडा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत होईल. दुपारी २ वाजता चोपडा तालुका सहकारी सुतगिरणीचे जिनींग व प्रेसिंग प्रकल्पाने भूमीपूजन समारंभ होणार आहे.

दुपारी ३.१५ ते ४.१५ दरम्यान जळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या शासकीय निवासस्थानांच्या नवीन इमारतीचे उद्घाटना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते होईल शिवाय ४ ते ५.३० दरम्यान पोलीस अधिक्षक कार्यालयात नाशिक परीक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था तसेच इतर विषयांच्या अनुषंगाने विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्यासोबत बैठक होणार आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३० शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे राखीव असून सायंकाळी ७ वाजता जळगाव विमानतळावरून विमानाने मुंबईकडे रवाना होतील.


