भुसावळात लेवा विकास महासंघाची १७ रोजी बैठक… केंद्रीय अध्यक्ष विष्णू भंगाळे करणार मार्गदर्शन

भुसावळ- येथे शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वा. विठ्ठल मंदिर, विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भुसावळ, रावेर, यावल, जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर येथील युवक संघटनांच्या प्रतिनिधींची नियुक्ती याप्रसंगी होणार असून प्रदेशाध्यक्ष महेंद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष राजेश वारके, जिल्हा उपाध्यक्ष गौरव भोळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर सरोदे आणि पदाधिकारी उपस्थित राहतील. संघटनेच्या माध्यमातून कार्य करू इच्छिणाऱ्या परिसरातील अधिकाधिक युवकांना उपस्थितीचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष प्रा. धिरज पाटील यांनी केले आहे.