वरणगाव नगपरिषद शासनाने लागू केलेली करवाढ त्वरित रद्द करावी : शिवसेनेतर्फे मुख्याधिकार्‍यांना दिले निवेदन: भाजपची सत्ता असताना ठराव असल्यानेच कर वाढ :

वरणगाव – वरणगाव नगरपरिषद प्रशासनाने वरणगाव वासियावर केलेली जुलमी करवाढ त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना शिवसेनेतर्फे निवेदन देऊन जोरदार मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगरपरिषद प्रशासनाने शिक्षण कर, वृक्ष कर, घनकचरा कर, रोजगार हमी कर हे लावलेले अवाजवी जुलमी करवाढ रद्द करावी. दि. 24/ 7/2015 वर्षी तत्कालीन भाजप पक्षाची सत्ता नगरपरिषदे होती. याच दिवशी ठराव क्रमांक आठ नुसार सर्वसाधारण सभेत सभागृहात ठराव मंजूर करून भाजपच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी करावाढ ठरवाला मान्यता दिली होती. आणि आता भाजप पक्षाचे करवाढीच्या विरोधात चमकोगिरी आंदोलन करून वरणगावकरांची फसवणूक करीत आहे. वरणगावकर जनता ‘सब जानती है’ कारण जनता सुज्ञ आहे. नौटंकी आंदोलन करून वरणगावकरांना देखावा दाखविण्याचा प्रयत्न भाजपचे करतच भाजपचे माजी नगराध्यक्ष पदाधिकारी करीत आहे. या नौटंकी आंदोलनाचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात येत असल्याचेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, उपशहर प्रमुख सुनील भोई, विभाग प्रमुख संजू कोळी, सुरेश चौधरी, मुस्लिम समाजाचे सय्यद जाफरअली उर्फ हिप्पीशेठ, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक सईद मुल्लाजी, संतोष माळी, सुखदेव धनगर, राम शेटे, रोहित मुळे, मितेश पाचपोळ, अबू सुफियान, अबूबकर खान, सय्यद मुजाहीद, प्रल्हाद माळी, ताज शेख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालक मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पाठविण्यात येणार आहे.