भुसावळात रेल्वे प्रबंधक कार्यालयात द्वितीय पेन्शन अदालत संपन्न :१४५ तक्रारींचा निपटारा :

मध्य रेल्वे भुसावळ – विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारीं संदर्भात दि. १५.१२.२०२१ रोजी मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात वर्ष २०२१ चे द्वितीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आले.

पेन्शन अदालत मध्ये एकूण १४५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात शंभर टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले. ज्यामध्ये रू. ११,०७,२७३/ – ची रक्कम देण्यात आली. या व्यतिरिक्त जानेवारी २०२० ते जुन २०२१ या कालावधित महागाई भत्ता मधे वाढ झाल्या कारणाने १३०० सेवानिव्रुत्त अथवा मयत कर्मचा-याच्या केसेस पुर्ण करून त्यात ग्रेज्युईटी आणी छुट्टी वेतन मधील फरक याचे भुगतान करण्यात आले.

पेन्शन अदालत चे मुख्य न्यायाधीश अपर मंडल रेल प्रबंधक श्री रुकमैया मीना तसेच लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी श्री एन. डी. गांगुर्डे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले.
पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष पी जे जावळे, एन. आर. सरोदे यांनी पेन्शनधारक व प्रशासनाच्या समस्या निवारणा संबंधी सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले.

या कोरोना काड़ात ही प्रशासन पेन्शनर्स चे तक्रारी चे निराकरन केले. प्रशासनाने यांचे कौतुक केले. तसेच ६० वर्षा नंतर हि सभाचे पेन्शनर्सनि नविन तंत्रज्ञानाचा उपयोग केला म्हणून आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे धन्यवाद सहाय्यक कार्मिक अधिकारी श्री बी एस रामटेके यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.

                    * * * * *