रेल्वे पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन ;


भुसावळ : रेल्वेत होणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेल्वे लोहमार्ग पोलिसांतर्फे नुकतेच ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यासाठी दोन अधिकारी व वीस अंमलदार यांचे पथक नेमण्यात आले होते.
ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान १२ स्टँडिंग वॉरंट (खंडवा ६, बुऱ्हाणपुर १, भुसावळ २, जळगाव ३) मधील आरोपीताचा शोध घेतला. तसेच पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपींमध्ये संशयीत आरोपी अस्लम खान हबीब खान (वय ६३, रा.खंडवा म.प्रदेश) येथे मिळून आला. त्यास अटक करून न्यायालयात हजर केले. या ऑपरेशन मध्ये
एक ७० वर्षीय आरोपी वेडसर अवस्थेत मिळून आला. तर चार आरोपी मयत झाल्याची माहिती मिळाली. ५ आरोपी हे दिलेल्या पत्यावर मिळून आले नाहीत. तसेच रेकॉर्डवरील १० आरोपींची तपासणी केली. त्यापैकी ३ आरोपी घरी मिळून आले नाहीत. आरोपी सोनू अवसरमल (वय ३०, रा. भारत नगर, भुसावळ) हा कारागृहात असल्याची माहिती मिळाली. अमोल रविंद्र भोवते (वय ३८, रा. द्वाराका नगर, भुसावळ) व आरोपी हसन अली नियाजली इराणी (वय २०, रा. पापानगर, भुसावळ), अल्ताफ शहा सिरातशहा फकीर (वय २३, रा. पाचोरा) यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई औरंगाबाद लोहमार्गच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस उपअधीक्षक दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे, सहा.निरीक्षक भाऊसाहेब मगरे, एएसआय सुनील इंगळे, भरत शिरसाठ, अनिंद्र नगराळे, राजेश पुराणिक, राजेश पवार, पोलिस हवालदार अनिल खोडके, पांडुरंग वसु, जगदीश ठाकुर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपुत, अजित तडवी, सागर खंडारे, प्रदीप शेजवळकर, गोपाळकृष्ण सोनवणे, राजेश पाटील, शिपाई ज्योती शाहु आदींच्या पथकाने केली.