शैक्षिक आगाज व समता फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण संपन्न ; वृक्षरोपण करण्यासाठी कोणत्याही शुभ प्रसंगाचे निमित्ताने वृक्ष लावून संगोपन संवर्धन करा- राज्य समन्वयक नाना पाटील यांचे आवाहन :

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग लगत जिजाऊ उद्यान येथे समता फाउंडेशन चे संचालक पुरुषोत्तम अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले .याप्रसंगी शैक्षिक आगाज चे राज्य समन्वयक व निसर्ग पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी वेगवेगळ्या शुभ कार्याच्या निमित्ताने आपण एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन आणि संगोपन केलं पाहिजे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. लावण्यात आलेल्या सर्व बहात्तर वृक्षांना आज ट्री गार्ड लावण्यात आले

या वृक्षारोपणाच्या प्रसंगी साकेगाव गावाचे माजी सरपंच आनंदा साहेब ठाकरे ,गणेश पाटील त्याचबरोबर इतर मान्यवर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तसेच शैक्षिक आगाजचे राज्य समन्वयक व निसर्ग पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील सुरेंद्र सिंग पाटील रघुनाथ आप्पा सोनवणे तसेच समता फाऊंडेशनचे तुषार गालफाडे आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित होते जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदून त्यात वृक्षारोपण करून टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करून ट्री गार्ड रोपांना लावण्यात आले हे जिजाऊ गार्डन राष्ट्रीय महामार्ग महामार्ग क्रमांक सहा लगत असल्याने झाडे लावल्याने अधिक सुशोभित दिसत आहे .